बुधवार, ३० मे, २०१२

कीड

कीड... सडलेल्या फळात वळवळते नं? तसंच. तसंच जगणं आपलं . सुंदर फळात घर करा... आजूबाजूला सगळं मुबलक. आस्वाद घेत राहा. सोबत तिथेच घाणही करीत राहा.. तिथेच त्या घाणीत नवीन गरजा तयार करा .... फळाच्या सडण्याला गती द्या. प्रजा वाढवा. अगदी पटीपटीने.... मग त्या फळात प्रचंड आणि अखंड वळवळ...काही दिवसांनी कोष होऊन पडायचं अन मग उडून जायचं. किडलेलं फळ अन त्यातली घाण मागे ठेऊन....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.