शनिवार, २६ जून, २०१०

आयुष्यातली काही वळणं इतकी वक्र असतात की वाटेवर रस्ता पुढे कुठे कसा जातोय तेच कळेनासं होतं. आपण भांबावून जातो. अशाच एका वळणावर मी उभा आहे आणि उद्याकडे पाहतोय.

मंगळवार, १५ जून, २०१०

समर्थांचं काव्य

असंच मला आवडलेलं समर्थांचं आणखी एक काव्य!!! पाहू तुम्हाला यातील किती नावं ठाऊक आहेत ते !!!


प्रसंग निघाला स्वभावें । बागेमध्ये काय लावावे ।
म्हणुनी घेतली नावे । काही एक ॥
कांटी रामकांटी फुलेकांटी ।  नेपती सहमुळी करमाटी ।
सावी चीलारी सागरगोटी । हिंवर खैर खरमाटी ॥ 
पांढरफळी करवंदी तरटी । आळवी तोरणी चिंचोरटी । 
सिकेकाई वाकेरी घोंटी ।  करंज विळस समुद्रशोक ॥
अव्हाटी बोराटी हिंगणबेटी । विकळी टांकळी वाघांटी ।
शेर निवडुंग कारवेटी । कांटेशेवरी पांगेरे ॥
निरगुडी येरंड शेवरी । कासवेद कासळी पेरारी ।
तरवड उन्हाळ्या कुसरी । शिबी तिव्हा अंबोटी ॥
कांतुती काचकुहिरी सराटी । उतरणी गुळवेल चित्रकुटी 
कडोची काटली गोमाटी । घोळ घुगरी विरभोटी ॥
भोंस बरु वाळा मोळा । ऊंस कास देवनळा ।
लव्हे पानि पारोस पिंपळा । गुंज कोळसरे देवपाळा ॥
वेत कळकी चिवारी । ताड माड पायरी पिंपरी ।
उंबरी अंबरी गंभिरी । अडुळसा मोही भोपळा ॥
साव सिसवे सिरस कुड । कोळ कुंभा धावडा मोड ।
काळकुडा भुता बोकडा ।  कुरंडी हिरंडी लोखंडी ॥
विहाळ गिळी टेंभुरणी  । अवीट एणके सोरकिन्ही ।
घोळी   दालचिनी ।  कबाबचीनी जे ॥
निंबारे  गोडे निंब । नाना महावृक्ष तळंब ।
गोरक्षचिंच लातंब । परोपरीची ॥
गोधनी शेलवंटी भोंकरी । मोहो बिब्बा रायबोरी ।
बेल फणस जांब भरी । चिंच अंबसोल अंबाडे ॥ 
चांफे चंदन रातांजन । पतंग मैलागर कांचन । 
पोपये खेलेले खपान । वट पिंपळ उंबर ॥
आंबे निंबे साखरनिंबे । रेकण्या खरजूरी तूंते दाळिंबे ।
तुरडे विडे नारिंगे । रोवे कविट अंजीर सीताफळे ॥

जांब अननस देवदार । सुरमे खासे मंदार । 
पांढरे जंगली लाल पुरे। उद्वे चित्रकी ॥
केळी नारळी पोफळी । आवळी रायआवळी जांभळी ।
कुणकी गुगुळी सालफळी । वेलफळी माहाळुंगी ॥     
भुईचांफे नागचांफे मोगरे । पारिजातक बटमोगरे ।
शंखासुर काळे मोगरे । सोनतरवड सोनफुले ॥
जाई सखजाई पीतजाई । त्रिविध शेवंती मालती जुई । 
पाडळी बकुळी अबई । नेवाळी केतकी चमेली ॥
सुर्यकमळिणी चंद्रकमळिणी । जास्वनी हनुमंतजास्वनी ।
केशर  कुसुंबी  कमळिणी । बहुरंग निळायति ॥
तुळसी काळी त्रिसेंदरी । त्रिसिंगी रायचचु रायपेटारी ।
गुलखत निगुलचीन कनेरी । नानाविध मखमाली ॥
काळा वाळा मरुवा नाना । कचोरे गवले दवणा । 
पाच राजगिरे नाना । हळदी करडी गुलटोप ॥
वांगी चाकवत मेथी पोकळर । माठ शेपु खोळ बसळा ।
चवळी चुका वेल सबळा । अंबुजिरे मोहरी ॥
कांदे मोळकांदे माईणमुळे । लसूण आले रताळे । 
कांचन कारिजे माठमुळे । सुरण गाजरे ॥
भोंपळे नाना प्रकारचे । लहानथोर पत्रवेलीचे ।
गळ्याचे पेढ्या सांगडीचे । वक्र वर्तुळ लंबायमान ॥ 
गंगाफळ काशीफळे क्षीरसागर । सुगरवे सिंगाडे देवडांगर । 
दुधे गंगारूढे प्रकार । किन-या रुद्रविण्याचे ॥
वाळक्या काकड्या चिवड्या । कोहाळे सेंदण्या सेंदाड्या ।
खरबूजा तरबुजा कलंगड्या । द्राक्षी मिरवेली पानवेली ॥
दोडक्या पारोशा पडवळ्या । चवळ्या कारल्या तोंडल्या ।
घेवड्या कुही-या खरमुळ्या । वेली अळूचमकोरे ॥
अठराभार वनस्पती । नामे सांगावी किती ।
अल्प बोलिलो श्रोती । क्षमा केली पाहिजे ॥

सोमवार, १४ जून, २०१०

मला कुठे काही छान वाचलं की ते लिहून ठेवायची सवय होती. मी शिवथरघळला समर्थांची ही कविता वाचली आणि अनुभवली. तिथे जावं आणि अनुभवावं असंच आहे हे!


गिरीचे मस्तकी गंगा । येथुनि चालती बळे॥
धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळे ॥
गर्जता मेघ ती सिंधू । ध्वनी कल्लोळ उठिला ॥
कड्याशी आदळे धारा । वात आवर्त होतसे ॥
तुषार उठती रेणू । दुसरे रज मातले ॥
वात मिश्रीत ते रेणू । सीत मिश्रीत धुकटे ॥
दराच तुटला मोठा । झाड खंडे परोपरी ॥
निबीड दाटती छाया । त्यामध्ये वोघ वाहती ॥
गर्जती श्वापदे पक्षी । नाना स्वरे भयंकरे ॥
गडद होतसे रात्री । ध्वनी कल्लोळ उठती ॥
कर्दमू निवडीना तो । मानसी साकडे पडे ॥
विशाळ लोटली धारा । ती खाले रम्य विवरे ॥
विश्रांती वाटते तेथे । जावया पुण्य पाहिजे ॥
कथा निरुपणे चर्चा । सार्थके काळ जातसे ॥

Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.