सोमवार, १४ जून, २०१०

मला कुठे काही छान वाचलं की ते लिहून ठेवायची सवय होती. मी शिवथरघळला समर्थांची ही कविता वाचली आणि अनुभवली. तिथे जावं आणि अनुभवावं असंच आहे हे!


गिरीचे मस्तकी गंगा । येथुनि चालती बळे॥
धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळे 
गर्जता मेघ ती सिंधू । ध्वनी कल्लोळ उठिला 
कड्याशी आदळे धारा  वात आवर्त होतसे 
तुषार उठती रेणू । दुसरे रज मातले 
वात मिश्रीत ते रेणू  सीत मिश्रीत धुकटे 
दराच तुटला मोठा  झाड खंडे परोपरी 
निबीड दाटती छाया  त्यामध्ये वोघ वाहती 
गर्जती श्वापदे पक्षी  नाना स्वरे भयंकरे 
गडद होतसे रात्री  ध्वनी कल्लोळ उठती 
कर्दमू निवडीना तो  मानसी साकडे पडे 
विशाळ लोटली धारा  ती खाले रम्य विवरे 
विश्रांती वाटते तेथे  जावया पुण्य पाहिजे 
कथा निरुपणे चर्चा  सार्थके काळ जातसे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.