उबुंटूची नवी आवृत्ती येत्या २६ तारखेला खुली होतेय. काय आहे उबुंटू?
शब्दशः पाहिलं तर हे एक तत्वज्ञान आहे. आफ्रिकेतलं. माणुसकीचं तत्वज्ञान.
पण मी ज्या उबुंटू बद्दल बोलतोय, ती आहे एक लिनक्स वर आधारीत काँप्युटर ऑपरेटिंग सिस्टीम. लिनक्सचं तत्वज्ञानही असंच. म्हणजे तुम्ही वापरा, सुधारणा करा आणि सुधारीत आवृत्ती इतरांना वापरायला द्या. हे सगळं फुकट. माणुसकीसाठी.
आपल्याला काँप्युटर म्हटलं की विंडोज हेच समिकरण माहीत आहे आणि विंडोजवाल्या मायक्रोसॉफ्टचा कोट्याधीश झालेला बिल गेटस माहित आहे. हे 'फुकट'चं तत्वज्ञान नाही माहित आपल्याला. त्याच्यामागेही काही गैरसमज आहेत. त्याकडे आपण नंतर येऊ.
तर लिनक्सचा जन्म कसा झाला?
लिनस तोरवाल्ड्सने लिनक्सचा कर्नेल ५ ऑक्टोबर १९९१ला सर्वप्रथम प्रसारीत केला. त्याआधी १९८३ मध्ये रिचर्ड स्टालमनने युनिक्स वर चालणारी सर्व सॉफ्टवेअर्स तयार करून सर्व लोकांना मोफत उपलब्ध करून दिली होती (या प्रोजेक्टचं नाव होतं GNU). मग GNU आणि Linux मिळून एक परिपूर्ण ऑपरेटिंग सिस्टीम तयार झाली.
तर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम घेऊन त्यात छोट्या मोठ्या सुधारणा करून (मुख्यतः ग्राफिक युसर इंटरफेस) त्याचे केलेले वेगवेगळे प्रकार सर्वांसाठी आज खुले आहेत. त्यात उबुंटू सर्वांत वर आहे. उबुंटूव्यतिरिक्त फेडोरा, मिंट आणि खुद्द उबुंटूचेही अनेक प्रकार आहेत. लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम ही विंडोजपेक्षा कितीतरी चांगली व सुरक्षित आहे. व्हायरस अजून तरी लिनक्सला बाधित करू शकत नाही. याचं एक महत्वाचं कारण म्हणजे लिनक्सची काम करण्याची पद्धत आणि दुसरं म्हणजे त्याचा जगभरातला कमी वापर. आणखी एक असं की जगभरात कुणी ना कुणी सतत लिनक्सला सतत चांगली बनवत असतं. त्यामुळं लिनक्सला धोका जरी निर्माण झाला तरी त्यावर उपाय ताबडतोब तयार असतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लिनक्स अगदी मोफत आहे. विंडोजवर असणा-या प्रोग्राम्सच्या तोडीचे किंवा त्याहूनही चांगले प्रोग्राम्स लिनक्स साठी मोफत मिळून जातात. विंडोजशिवाय आपलं कुठलंच काम अडत नाही.
मग तरीही लोक लिनक्स का वापरत नाहीत? यामागे एक सर्वात मोठा गैरसमज असा आहे की लिनक्सवर काम करणं म्हणजे DOS वर काम करण्यासारखं आहे. सर्व काही कमांड वरच चालतं. हा साफ चुकीचा गैरसमज आहे. उबुंटू किंवा इतर आवृत्त्यांमध्ये आपण अगदी विंडोजसारखं माऊसने क्लिक करत काम करू शकतो. यांचा ग्राफिक युजर इंटरफेस अगदी विंडोजच्या तोडीचा किंवा ॲपलच्या तोडीचा आहे!!!
तर मग वाट कसली पाहताय? चला लगेच http://www.ubuntu.com/download
इथनं उबुंटू डाऊनलोड करा आणि वापरायला लागा! जर काही अडलंच तर मी मदत करायला तयार आहे. आणि हो, उबुंटू वापरणारे हजारो जण इंटरनेटवर तुम्हाला मदतीसाठी उत्सुक आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर इंटरनेटवर आधीच कुणी देऊनही ठेवलं असेल!!!
पहा माझ्या काँप्युटरवर उबुंटू असं दिसतं!!!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा