मायाजाल अन् महाजाल.....
काय हवं ते म्हणावं. लहानपणी इंद्रजाल व त्याच्या गोष्टी ऐकल्या होत्या तसंच हे. किंवा मृगजळ... हां... हा शब्द चपखल आहे.
मृगजळात हलणा-या सावल्या दिसतात... खोट्या खोट्या. खरं काहीच नसतं. प्रतिबिंबं पण दिसतात. अगदी खरी वाटावीत अदुसऱयाया पेक्षाही मनोरम. तसंच या मायाजालाचं. मित्र आहेत, सोशल नेटवर्कींग आहे, सगळे कनेक्टेड आहेत. खोटे खोटे. अरे तो ना... तो आहे मा़झ्या कॉन्टॅक्ट मध्ये...
कॉन्टॅक्टमधले जेव्हा प्रत्यक्षात भेटतात तेव्हा त्यांच्या तारा जुळतातच असं नाही. मध्ये कित्येक वर्षांची दरी उभी राहते. मग पाच मिनीटांनंतर काय बोलावं हे कळत नाही अन शांतता जीवघेणी, असह्य होऊन जाते.
हरणाची गोष्ट ऐकली होती... ते म्हणे कधी कधी या मृगजळाच्या पाठी पाण्याच्या आशेने धावत राहतं... धावतं.... धावतं... छाती फुटेस्तोवर. अन् मग छाती फुटून मरतं. म्हणून हे मृगजळ.
आपणही अशा मृगजळाच्या पाठी धावतो. खरं पाणी अन् मृगजळात आपल्यालाही फरक समजत नाही. मग छाती फुटून मरण. ख-या पाण्याचे झरे आजुबाजूलाच होते हे कळून चुकतं.
दुसरी सल म्हणजे शेवटपर्यंत आपण "आपण" म्हणून जगतच नाही. आम्हां भारतियांमध्ये तर हे फार. "जगायचं जगायचं म्हणतांना जगायचंच राहून गेलं" तशी गत.
सलील कुलकर्णींचं "मी म्हणालो बऽऽऽरं" वाचलं अन् वाटलं किती खरं लिहीलंय....
आपल्या भोवती चौकोन तयार झालेत. कुणाभोवती वलयांकीत अशी वर्तुळंही असतील. पण प्रत्येकाभोवती काही ना काही भूमितीय आकार. प्रत्येक जण आपापल्या आकाराच्या आतच जगतो. त्याच्या बाहेर जगता येतं का ठाऊक नाही.
हे आकार कोणी बनवले आपल्या भोवती? हो... मायाजालाचाच एक भाग असलेली माध्यमं. आपण या काल्पनीक विश्वात जगायला शिकतोय. व्हर्च्युअल लाईफ...खरं काहीच नाही. भावनांचं भडक प्रदर्शन. कट, कपट, कारस्थानं...अन् मयताला जातानाही लेटेस्ट फॅशन. प्रेमाचीही फॅशन, बालविवाहाचीही फॅशन, सासू सुनांच्या भांडणाचीही फॅशन, भक्तीचीही फॅशन अन् शक्तीचीही फॅशन. श्रीमंतीची फॅशन अन् गरिबीचीही फॅशन... फॅशनचेच चौकोन, त्रिकोण अन वर्तुळं....
पूर्वी भावना म्हणे नाजूक असायच्या. आता त्या भडक असतात.
पूर्वी म्हणे लोकांच्या भोवती अशा भूमितीय आकृत्या नव्हत्या. कसे जगत ते?
चित्रकलेतला एक प्रकार आठवला. त्यात वेगवेगळे भूमितीय आकार. प्रत्येक आकार दुसऱ्या आकाराला कुठेतरी छेद देतो. प्रत्येकाचा रंग तसा वेगळा. मग छेद दिलेल्या भागाचा रंग अजूनच वेगळा. असे अनेक छेद, अनेक रंग. सुंदर दिसतं सगळं. तरीही प्रत्येक आकार हवा तेव्हा वेगळा ओळखता येतो. इतर आकारांबरोबर मिसळून गेलेला. तरीही वेगळा.