layers of life लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
layers of life लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शनिवार, ४ सप्टेंबर, २०१०
कांदा.
कांद्यासारखं असावं आपलं आयुष्य. जीर्ण झालेले विचार, समजुती, धारणा सतत काढून टाकाव्यात पाचोळ्यासारख्या. आणि आतून उमलावेत नवचैतन्याने रसरसलेले अनेक पदर. हे सतत चालू राहावं आयुष्य संपेपर्यंत.
आणि मग, कधीतरी परिस्थितीही अनुकूल होइल आणि आतून उगवेल एक नवा हिरवा अंकुर! सृजनाचा.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
