या ठिकाणी रसायनं म्हणजे मानवनिर्मीत कृत्रिमरित्या तयार केलेले पदार्थ... रसायनशास्त्राच्या व्याख्येतील नाही.
सकाळी उठलं की दात घासायला रासायनीक पेस्ट. मग रासायनीक साबण, शँपू वगैरे ने अंघोळ. कपडे धुवायला वेगवेगळ्या रासायनीक पावडरी. मग वेगवेगळ्या रसायनांचे थर चेहरा आणि केसांवर चोपडणं. कृत्रीम सुगंधी रसायनांचे अंगावर फवारे (फेरोमोन्स शी साधर्म्य साधण्याचा प्रयत्न करणारे आणि आणि अंगच्या वासाबरोबर आपली ओळख ही लपवून ठेवणारे).
खाण्या-पिण्यात प्रिजर्वेटिव्ज....म्हणजे रसायनं. जरी साधं जेवलं तरी रासायनीक किटकनाशकांचे, खतांचे अंश येतातच. त्यांना कसं थोपवणार ? कृत्रीम रासायनीक स्वादांची तर रेलचेल !
औषधांमध्ये विटॅमीन्सचा भरमार (यातील बराच अंश शरीराला न लागणारा अन टाकून दिला जाणारा), हॅार्मोन्स इ. इ.
भांडी घासायला रासायनीक साबण (फारशी खराब झाली नसली तरी), फरशी़ धुवायला अशीच अनेक रसायनं). टॉयलेट क्लीनर्स तर विचारूच नका.
डास पळवून लावायला, झुरळं मारायला, उंदीर मारायला वेगवेगळी विषं.... यादी खूप मोठी होईल...
याचे काय कसे आणि किती परिणाम आपल्या शरिरावर होतात किंवा वर्षानुवर्षांच्या वापराने होऊ शकतात याचा विचार कोण करतो?
ही सर्व रसायनं सांडपाण्यात मिसळून नद्या, तळी अशा ठिकाणी साठत जातात. भूजलात मिसळतात. अन पिण्याच्या पाण्यावाटे पुन्हा आपल्या शरीरात प्रवेश करतात. मग यातल्या काही गोष्टी आपण वापरत नसलो तरीही.
आणि हे सर्व जाहिरातींनी हळूहळू आपल्यावर थोपवलेलं. आपला ब्रेन वॅाश केलेला. म्हणजे हे काही वापरलं नाही तर आपण किती मागास नाही तर अस्वच्छ आहोत हे सांगत.
या सर्व गोष्टींना नैसर्गीक पर्याय असताना?
फक्त वीस-तीस वर्षांपूर्वी या सगळ्या गोष्टी किती कमी होत्या?