शनिवार, १० मे, २०१४

प्रथम नागरीक?

या वेळच्या निवडणुका काही वेगळ्याच....
मतदारांनी मतदान टक्केवारीचे विक्रम केलेत. आणि या महान देशाच्या महान लोकशाहीतील प्रथम नागरीक मा. राष्ट्रपतींनी मतदान न करण्याचा निर्णय घेतलाय....असं प्रथमच घडतंय. निराशाजनक अन् संतापजनक.
काय तर म्हणे त्रयस्थ भूमिकेत राहण्यासाठी हा निर्णय घेतला.
पण मतदान हा अधिकार आणि कर्तव्य आहे, ते न करणं लोकशाहीला मारक. आणि देशाच्या प्रथम नागरीकाने ते न करणं तर अजून खेदजनक.
एकीकडे सर्व प्रसिद्धी-माध्यमांमधून मतदानासाठी लोकांना प्रोत्साहित केलं जात होतं, इतकंच नाही तर जाहिरातींमध्येही याबाबतीत कल्पकता पाहायला मिळाली.... ज्यांना मतदान करता आलं नाही त्यांनी कोर्टात दावे दाखल केले आणि दुसरीकडे हे असं.
राष्ट्रपतींकडून ही अपेक्षा नाही..... 

Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.