बुधवार, ३० मे, २०१२

सवय

एक ब्लॉगर मित्र म्हणाला तसंच... म्हणजे दिवसांचीही आपल्याला सवय झालीय. माणूस तर सवयीचा गुलाम. सवय सुटता सुटत नाही. दिवस गुलाम बनवून ठेवतात... रोज सवयीने त्याच त्याच गोष्टी करायच्या. नको असल्या तरी करायच्या.   

आणि मग कुणा एका कविनुसार, जगण्याचीही सवय होते.  

कीड

कीड... सडलेल्या फळात वळवळते नं? तसंच. तसंच जगणं आपलं . सुंदर फळात घर करा... आजूबाजूला सगळं मुबलक. आस्वाद घेत राहा. सोबत तिथेच घाणही करीत राहा.. तिथेच त्या घाणीत नवीन गरजा तयार करा .... फळाच्या सडण्याला गती द्या. प्रजा वाढवा. अगदी पटीपटीने.... मग त्या फळात प्रचंड आणि अखंड वळवळ...काही दिवसांनी कोष होऊन पडायचं अन मग उडून जायचं. किडलेलं फळ अन त्यातली घाण मागे ठेऊन....

Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.