Saturday, 22 January 2011

तळं / डबकं आणि स्थलांतरित पाहुणे!

संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवायला गच्चीत गेलो होतो. तिथून एक छोटंसं डबकेवजा तळं दिसतं.....(बायको त्याला तलावच म्हणते, पण मी डबके म्हणतो कारण त्याचे पाण्याचे सगळे स्त्रोत बंद झालेत आणि आता फक्त सांडपाणीच त्याला मिळतं!) त्यात आता लोकांनी (बिल्डरांनी ) डबरही टाकायला सुरुवात केलीय. तर त्या डबकेवजा तळ्यात असंख्य काळे ठिपके आम्हाला दिसले.आम्ही कुतूहलाने नीट पाहिल्यावर कळले की ते पक्षी आहेत. आम्ही जवळ जाऊन पहायचं ठरवलं. आम्हाला एक अत्यंत सुखद धक्का बसला.तो म्हणजे त्या तळ्यात असंख्य म्हणजे अगदी हजारांवर स्थलांतरित पक्षी आले होते...कधी असं वाटलंही नसतं कि तिथे पक्षी येतील... अनेक जाती प्रजातींचे पक्षी त्या पाण्यावर तरंगत होते !!! त्या दिवशी ठरवलं की पुन्हा इथे यायचं फोटो काढायला.
आज तिथे गेलो होतो. भान हरपून गेलो. तळ्याच्या जवळच्या घाणीची तमा न बाळगता आम्ही तळ्याच्या जवळ पोचलो आणि मग लक्षात आलं की हे एक वेगळंच विश्व आहे. निसर्ग तिथे अजूनही जिवंत आहे! (हे दृश्य किती दिवस टिकेल याची मात्र शंका आहे, कारण त्या तळ्याचा, त्याच्या आजूबाजूच्या झुडपांचा, आणि जैव वैविध्याचा श्वास गुदमरतोय..... त्या तळ्याला चहूबाजूंनी इमारतींनी वेढून तर टाकलंच आहे पण कचरा आणि सांडपाणी टाकण्याची ती एक जागा झालीय.)
तिथले काही फोटो......


आणि या पक्षांबरोबरच इतर नेहमीच्या पक्षांचाही दृष्टांत झालाNo comments:

Post a Comment

Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.